‘मॅथ्यू’ चक्रीवादळाचा हैतीला तडाखा, फ्लोरिडात आणीबाणी जाहीर

October 7, 2016 11:22 AM0 commentsViews:

 

07 ऑक्टोबर :  कॅरेबियन देश हैतीमध्ये मॅथ्यू  चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅथ्यू वादळाने संपूर्ण हैती शहर उद्धवस्त केलं आहे.  या वादळात आत्तापर्यंत किमान 339 लोकांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण हैती शहर उदध्वस्त झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे.

Hurricane Matthew

हैतीच्या दक्षिण आणि पश्चिम भागाचा संपर्क तुटला आहे. कॅरेबियन देशात मागील एक दशकातील हे सर्वात विध्वंसक आणि शक्तिशाली वादळ असल्याचं सांगितलं जातं आहे.  या चक्रीवादळामुळे जवळपास 21 हजार नागरिक विस्थापित झालेत, तर लाखो जण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तिथल्या प्रशासनाने बचावकार्य सुरू केलं असलं तरी चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान एवढं मोठं आहे की, वादळाने प्रभावित झालेल्या सर्व नागरिकांपर्यंत मदत पोचण्यासाठी अडचणी येत आहेत. हैतीजवळ कॅरिबियन समुद्रातल्या इतर देशांनाही या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. डॉमिनिकन रिपब्लिक, सेंट व्हिन्सेंट या देशांमध्येही या चक्रीवादळामुळे अनेकांचे बळी गेले आहे.

दरम्यान, ‘मॅथ्यू’ चक्रीवादळाचा तडाखा आता अमेरिकेलाही बसण्याची शक्यता आहे. अमेरिकच्या आग्नेय भागतल्या राज्यांमध्ये या वादळाचा सौम्य परिणाम पहायला मिळतोय. त्यामुळे चक्रीवादळाची शक्यता लक्षात पाहाता अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडा राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा