सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणार्‍यांना अक्षय कुमारनं सुनावले खडे बोल

October 7, 2016 9:34 AM0 commentsViews:

7 ऑक्टोबर: उरी हल्ल्यानंतर देशभरात सुरू झालेल्या चर्चांना अक्षय कुमारने सडेतोड उत्तर दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन या सगळ्या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

akshay-kumar

एकीकडे सैनिक मरतायत आणि कोणी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे, तर कुणी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करत आहे, तर कुणाला भीती वाटते की युद्ध होईल की काय? या चर्चेतच रमतोय. अरे पण आपल्याला याची लाज कशी वाटत नाही..  ही चर्चा नंतर करा. पहिले हा विचार करा की, कुणीतरी सीमेवर आपले प्राण दिले आहेत. 19 जवान उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर एक 24 वर्षाचा जवान नितीन यादव बारामुलामध्ये शहीद झाला आहे, असं अक्षयनं निक्षून सांगितलंय.

अक्षयचे वडील स्वताः लष्करात अधिकारी होते. त्यामुळे आपण हे मत  एक सुपरस्टार म्हणून नाही तर एका सैनिकाच्या मुलाच्या नात्याने मांडत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

बेबी, एअरलिफ्ट, रुस्तम यांसरख्या सिनेमांतून अक्षय कुमारचं देशप्रेम दिसून आलं होतं. पण हे देशप्रेम फक्त सिनेमात नाही तर खर्‍याखुर्‍या आयुष्यातही आहे, हे त्यानं दाखवून दिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा