पिंपरी-चिंचवड महापालिकेत टीडीआर घोटाळा

April 22, 2010 12:00 PM0 commentsViews: 2

22 एप्रिल

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात टीडीआर वाटपात घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर वाटपाच्या घोटाळ्यावरुन काही बिल्डर आणि राजकारण्यांचा खूष करण्याचा डाव साधण्यात आला आहे.

पण या सगळ्यात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यानांच फायदा होतोय, असा विरोधकांचा आरोप आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होऊनही ज्या कामासाठी जागा ताब्यात घेतली होती, त्यातील कामे पूर्ण झाली नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

रस्ते, उद्याने, नाट्यगृहे तसेच इतर अनेक विकास कामांसाठी महापालिका जागा ताब्यात घेते. त्या बदल्यात पैशांएवजी हा टीडीआर दिला जातो.

पण या टीडीआरबद्दलची माहिती अधिकारी, राजकारणी आणि बिल्डर यांनी जाणून घेतली आणि स्वत:चाच फायदा करुन घेतल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.

close