मुंबईत खड्ड्यांचं साम्राज्य असताना एमएमआरडीएचा रोप-वेचा प्रस्ताव

October 7, 2016 2:37 PM0 commentsViews:

Rope way

07 ऑक्टोबर : एकीकडे मुंबईकर खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे त्रस्त झालेत तर, दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीएनं ‘रोप वे’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लवकरच माथेरान, नवी मुंबई-घाटकोपर, बोरीवली-ठाणे या दरम्यान ‘रोप वे’ उभारण्यात येणार आहेत.

 ठाणे-मुंबईकरांसाठी उपनगरीय रेल्वेचा प्रवास तसंच रस्ते वाहतुकही दिवसेंदिवस नकोशी झाली आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि जास्त भूसंपादन करावं लागणार नाही, अशा प्रकल्पांना प्राधान्य द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या.

त्यानुसार मेट्रो, मोनोच्या तुलनेत रोप वे हे कमी वेळात आणि कमी खर्चात होणारे प्रकल्प असून मुंबई, ठाण्यात या प्रकल्पांमुळे लोकांची चांगली सोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार असून शहरात येणार्‍या पर्यटकांसाठीही रोप वे आकर्षण ठरेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा