सौदीतील जेद्दा हल्ल्याचं बीड कनेक्शन, आत्मघातकी हल्लेखोर बीडचा?

October 7, 2016 5:10 PM0 commentsViews:

 fiayz345324

07 ऑक्टोबर : सौदी अरेबियाचं महत्वाचं शहर असलेल्या जेद्दात झालेल्या हल्ल्याचं बीड कनेक्शन समोर येतंय. आत्मघातकी हल्लेखोर अब्दुल्ला कलझार खान हा बीडचा फैय्याज कागजी असल्याची माहिती समोर आलीये. महाराष्ट्र पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येतेय.

जेद्दात काही महिन्यांपूर्वी आत्मघातकी हल्ला झालाय. त्यात चार सौदी सुरक्षा अधिकाऱ्यांसह एक जणांचा मृत्यू झालाय. ह्या आत्मघातकी हल्ल्यात हल्लेखोर अब्दुल्ला कलझार खान हाही मारला गेला. सुरुवातीला तो पाकिस्तानी असल्याचं सांगितलं गेलं. पण हा अब्दुल्ला कलझार खान हा दुसरा तिसरा कुणी नसून तोच बीडचा फैय्याज कागजी असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. प्राथमिक माहितीत अब्दुल्ला कलझार खान हा ब्रिटनमधून आईसोबत तो सौदीत राहण्यासाठी आल्याची माहिती होती. पाकिस्ताननेही त्यावेळेस अब्दुल्ला कलझार खानची अधिक माहिती मिळवली जात असल्याचं सांगितलं जात होतं.

फैय्याज कागजी कोण आहे?
 
– सौदीतल्या जेद्दा स्फोटात फैय्याज कागजीचं नाव
– फैय्याज कागजी हा मुळचा बीडचा, सीमीशी संबंधीत
– फैय्याज बांग्लादेशमार्गे पाकिस्तानला गेल्याची माहिती
– फैय्याज हा लष्कर ए तोयबाशी संबंधीत नंतर तो सौदीत गेल्याची माहिती
– पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटाशी फैय्याजचा संबंध
– 26/11च्या मुंबई स्फोटाशी फैय्याजचा संबंध, अबू जुंदालचा खास
– औरंगाबादच्या शस्त्रसाठा प्रकरणातही फैय्याज कागजीचं नाव


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा