मुंबई इंडियन्स फायनलमध्ये

April 22, 2010 12:24 PM0 commentsViews: 53

22 एप्रिल

सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

मुंबई इंडियन्सने सेमीफायनलमध्ये बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा 35 रन्सने दणदणीत पराभव करत फायनल गाठली. आयपीएलमध्ये विजयी कामगिरी करणार्‍या मुंबईने सेमीफायनलमध्येही तुफान कामगिरी केली.

पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबईने 5 विकेट गमावत 184 रन्स केले. कॅप्टन सचिन तेंडुलकर फक्त 9 रन्सवर आऊट झाला. पण अंबाती रायडू आणि सौरव तिवारी पुन्हा एकदा मुंबईच्या मदतीला धावून आले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 67 रन्सची पार्टनरशिप केली. रायडू 40 रन्सवर आऊट झाला.

पण तिवारीने 4 सिक्स आणि 3 फोर मारत आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. तर सहाव्या क्रमांकावर आलेल्या कायरन पोलार्डने फक्त 13 बॉलमध्ये 33 रन्स करत टीमला बलाढ्य स्कोअर उभा करुन दिला. याला उत्तर देताना बंगलोर रॉयलचीही सुरुवात खराब झाली.

कॅलिस 11 रन्स करुन आऊट झाला. तर पीटरसन आणि रॉबिन उत्थप्पाही मोठा स्कोअर करू शकले नाहीत. बंगलोरची टीम 9 विकेट गमावत 149 रन्स करू शकली. आता डेक्कन आणि चेन्नईमधील विजेत्या टीमशी मुंबई फायनलमध्ये खेळेल.

close