सोलापुरात एनटीपीसी प्रकल्पात बाॅयलरचा भाग कोसळून 2 कामगारांचा मृत्यू

October 7, 2016 6:00 PM0 commentsViews:

solapur2342सोलापूर, 07 आक्टोबर : सोलापूरमधील ऊर्जा निर्मिती करणारा एनटीपीसी प्रकल्पामध्ये एका बाॅयलरचे काम सुरू असताना त्यातील लोखंडी स्ट्रक्चर अंगावर पड़ून 2 कामगारांचा मृत्यू झाला असून एक कामगार गंभीररित्या जखमी असल्याची माहिती एनटीपीसी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

एनटीपीसीच्या या ऊर्जानिर्मिती करणाऱ्या प्रकल्पातील जखमी कामगारांना सोलापूर येथील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यातील सर्व कामगार परप्रांतीय आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी आज काही कामगार दोरीच्या सहाय्याने बाॅयलरमध्ये लोखंडी अँगल उभारण्याचे काम सुरू होते. अचानक दोरी तुटली आणि लोखंडी अँगल कामगारांच्या अंगावर पडला. जवळपास १० कामगार अँगलखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, त्यात तीसहून अधिक कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येतेय. दरम्यान, अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलेय. घटनेनंतर  पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा