हे पाहा,पंकजा मुंडे कशी धमकी देतात !

October 7, 2016 6:52 PM0 commentsViews:

07 ऑक्टोबर : “परळीमध्ये तुम्हाला खेटायला वगैरे…पण आहेतच माझे लोकं…लोकांना मारहाण करून त्यांच्यावरच केस दाखल करून लोकांना तडीपार करता येतं…” हे वक्तव्य आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचं….भगवानगडावर येणारच अशी ठाम भूमिका घेत पंकजांनी थेट नामदेवशास्त्रींनी पाहुन घेत अशी धमकीच दिलीये. पंकजा मुंडेंचा धमकीनामा आयबीएन लोकमतच्या हाती आलाय. पंकजा मुंडे काय म्हणाल्यात हे जशाच्या तसे…pankaja_vs_namdevshashtri

पंकजा मुंडेंची धमकी

“आता मी तुम्हाला सांगते, मी माझ्या लोकांना सांगते की, अकरा तारखेपर्यंत आपल्याला भांडायचं नाही…मी तुम्हाला विकत घेऊ शकते, पण मला विकत घ्यायचं नाही…माझं तुमच्याशी खरं प्रेमाचं नातं आहे. मी तुम्हाला आतापर्यंत जे दिलंय ते न मागता दिलंय…इथून पुढेही न मागता देणार आहे…मी 25-15 चे पैसे बोलवू बोलवू दिले…आठवता का तुम्हाला…पण तुम्हाला आता पैसे देणार नाही…या ग्रामपंचायतीला दिले पैसे आठवतंय का…पण मी का कबुल केलं होतं तेव्हा भावनिक होऊन…आपल्या भगवानगडासाठी म्हणून…पुन्हा माझ्या डोक्यात ट्युब पेटली…आता नामदेवशास्त्रींचं पुढं काय करायचं तो भविष्यातला विषय आहे.

आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला….त्यामुळे मला काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही…आणि कुणीही आपल्याविषयी बोलेललं खपवून घ्यायचं नाही…त्यामुळं आपण आता स्ट्राँग भूमिकेनं जायचं…परळीमध्ये मी म्हटलं तुम्हाला खेटायला वगैरे…पण आहेतच माझे लोकं…लोकांना मारहाण करून त्यांच्यावरच केस दाखल करून लोकांना तडीपार करता येतं…पण ते साध्य नाही…कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता…ते नालायकच आहेत ना…दारू पिवून ते गोविंदांदासारख्या, केशवदादांसारख्या लोकांच्या अंगावर चालले ना….तिथंच राहून मारायलेत परत…त्यांच्या काय हिंमत आहे तेवढ्या मॉबमध्ये…आणि त्याच्यातले अजून एक…दोन-तीन गोष्टी ध्यानात ठेवा…बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगीन…टीम तुम्हाला सांगेल…तेवढं ऐका…स्वतःचं डोकं लावू नका प्लीज…कारण जास्त डोकं लावायचं नसतं आपण…साहेब काय म्हणायचे गरम डोकं आहे आपलं…जास्त डोकं लावायचं नाही…मी खूप थंड ठेवलंय डोकं बर्फ बर्फ ठेवून ठेवून…माझं डोकं उठलं त्यादिवशी यांच्या अंगावर गेले आणि मला ते सहन नाही झालं…आणि कधीच सहन करणार नाही...”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा