व्हॉट्सअॅप बंद पडलं तर काय करावं?

October 7, 2016 7:32 PM0 commentsViews:

 

7 ऑक्टोबर: बऱ्याचदा आपल्याला व्हॉट्सऍप युज करताना ‘Unfortunately,WhatsApp has stopped’ असा मेसेज मिळतो .युजर व्हॉट्सअॅपच्या आयकॉनवर क्लिक करतोआणि लगेच या नोटीफिकेशननंतर बाहेर पडतो. जर तुमचं व्हॉट्सऍप नीटपणे काम करत नसेल तर अनेक कारणं असू शकतात.आम्ही काही फॅक्टर्स आणि काही सोल्युशन सांगत आहोतय ज्याद्वारे आपण व्हॉट्सऍपचा क्रॅश इश्यु सॉल्व्ह करू शकता आणि व्हॉट्सऍप व्यवस्थीत सुरू ठेवू शकता.

टेक एक्सपर्ट केशव खेडा म्हणाले की, व्हॉट्सऍपमध्ये असे स्टॉप मेसेज येण्याचं मुख्य कारण म्हणजे ऍपचं अपग्रेड न होणं हे असतं. मात्र आपण आपला अँड्राईड जर लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट केला नसेल तरीही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.

याचं अजून एक कारण म्हणजे ऍपवर हजारो -लाखो मेसेज स्टोअर्ड झालेले असतात. यामुळेच व्हॉट्सऍप ओपन व्हायला जास्त वेळ घेतो,मग असे निरुपयोगी मेसेज डिलीट करावेत. मोबाईलचा कमी रॅम व्हॉट्सऍपच्या बंद होण्याचं कारण ठरतो. आपल्या डिवाईसचा रॅ़म चेक करावा. कदाचित तो जास्त जागा घेत असणार .नको असलेले ऍप अनइंन्स्टॉल करा.

व्हॉट्सऍपवर रोज बराच डेटा आणि चॅट स्टोअर होत असतो,ऍप मॅनेजरवर जाऊन कॅशे क्लिअर करावा आणि स्टोअर्ड डेटा डिलीट करावा.कदाचित यामुळे व्हॉट्सऍप हॅँग होणं कमी होईल.

कधी कधी व्हॉट्सऍप यासाठी हँग होत असतो कारण मोबाईल रिबुट करण्याची गरज असते यासाठी मोबाईल रिस्टार्ट करावा,त्यामुळे तो रिफ्रेश होतो आणि रॅमही क्लिअर होतो. आठवड्यातून एकदा असं करावं.

जर आपण मोबाईलचं सिमकार्ड बदललं असेलं तरीही व्हॉट्सऍप काम करणार नाही. व्हॉट्सऍप फक्त एका नंबरनेच मोबाईलवर काम करतो. यासाठी जुनं सिम कार्ड यात टाकावं. नवीन नंबरवरुन व्हॉट्सऍप सुरू करायचं असल्यास पहिलं व्हॉट्सऍप अनईन्स्टॉल करावं.

आणि रिईन्स्टॉल करुन नवीन नंबरने रजिस्टर करावं. यापैकी कोणतीच ट्रिक काम करत नसेल तरच हा उपाय करावा.मोबाईलमधून व्हॉट्सऍप अनईन्स्टॉल करुन रिइनस्टॉल करावा आणि चॅटचा बॅकअप घ्यावा. (photos -Getty)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा