आज दुसरी सेमीफायनल

April 22, 2010 12:41 PM0 commentsViews:

22 एप्रिल

आयपीएलमध्ये आज दुसरी सेमीफायनल रंगणार आहे, ती गतविजेत्या डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये. आणि आमने-सामने असतील ऍडम गिलख्रिस्ट आणि महेंद्रसिंग धोणी.

आयपीएलमध्ये या दोघांनी आपल्या कामगिरीसोबतच चतुर कॅप्टन्सीच्या जोरावर टीमला विजय मिळवून दिले आहेत. आयपीएलच्या तिसर्‍या हंगामात खराब सुरुवात करणार्‍या डेक्कनने सातव्या क्रमांकावरून थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेत सर्वच टीमना धक्का दिला आहे.

कॅप्टन गिरख्रिस्टसोबत अँण्ड्र्यू सायमंड, हर्षेल गिब्ज, रोहित शर्मा अशी भक्कम बॅटिंग ऑर्डर टीमची जमेची बाजू आहे. तर चेन्नईकडे दमदार बॉलर्सची फळी आहे.

मुरलीधरन, डग बॉलिंगर आर आश्विनने आपली छाप उमटवली आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीही फॉर्मात आल्याने टीमच्या आशा वाढल्या आहेत.

चेन्नईन सलग तिसर्‍यांदा आयपीएलच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी ते उत्सुक आहेत.

close