पंकजा मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही -धनंजय मुंडे

October 7, 2016 8:50 PM0 commentsViews:

dhanjay_munde_pankaja_munde07 ऑक्टोबर : पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या वादात आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतलीये. एका मंत्र्यांची कायदा हातात घेण्याची भाषा अत्यंत दुदैर्वी असून पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंनी येऊ नये असा विरोध महंत नामदेवशास्त्री यांनी केलाय. मात्र, भगवानगडावर येणारच असा पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतला. एवढंच नाहीतर आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नामदेवशास्त्रींना पाहुन घेते अशी धमकीच पंकज मुंडेंनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. जे कायदा तयार करण्याचं काम करत तेच कायदे हातात घेता अशा ग्रामविकास मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आयबीएन लोकमतशी बोलताना धनंजय मुंडेंनी केली. तसंच आपण भगवानगडावर कधी जायचं हा माझा व्यक्तीगत प्रश्न आहे. त्याचा गवगवा करण्याची आवश्यकता नाही असं सांगत पंकजा मुंडेंना टोलाही लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा