ठाणे महापालिका आरक्षण सोडतीत मनसेचा गोंधळ

October 7, 2016 9:51 PM0 commentsViews:

07 ऑक्टोबर : ठाणे महापालिका आरक्षण सोडतीवेळी प्रचंड गोंधळ झाला. प्रभाग रचना आरक्षण फुटल्याचा आरोप करीत मनसेनं प्रचंड गोंधळ घातला.

प्रभाग रचना, आरक्षण हे आधीच अनेकाच्या व्हॉट्सअपवर आलं होतं. त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी इच्छुक उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापालिका आयुक्तांविरोधात मनसे घोषणाबाजी करत होतं. सरतेशेवटी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ठाणे महापालिका प्रभाग रचना

एकूण प्रभाग 33
नगरसेवक 131
त्यापैकी महिला 66
अनुसूचित जाती – 9 (महिला 5)
अनुसूचित जमाती – 3 (महिला 2)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – 35 ( महिला 18)
सर्वसाधारण – 84 (महिला 41)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा