आता हायकोर्टाची नोटीस

April 22, 2010 12:56 PM0 commentsViews: 5

22 एप्रिल

मुंबई हायकोर्टाने बीसीसीआय आणि आयपीएलला नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्रात खेळवल्या गेलेल्या आयपीएल मॅचेसमध्ये किती रकमेची उलाढाल झाली, याची माहिती कोर्टाने मागवली आहे.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोर्टाने बीसीसीआयला हे आदेश दिलेत.

आयपीएलकडून कर वसूल करायचा नसेल तर तो कोणत्या कायद्यानुसार घेतला जात नाही, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी या जनहित याचिकेत देसाई यांनी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

त्यावेळी कोर्टाने आयपीएलची आर्थिक उलाढालीची माहिती देण्याचे आदेश बीसीसीआयला दिलेत.

close