अखेर प्रतिक्षा संपली, आयफोन 7 भारतात आला

October 7, 2016 11:55 PM0 commentsViews:

07 ऑक्टोबर : भारतात ऍपल आयफोनची प्रतिक्षा आता संपलीये. 7 सप्टेंबरला सॅन फ्रॅन्सिस्को इथे लाँच झालेल्या आयफोन 7 आणि आयफोन प्लस 7 भारतात दाखल झाले आहे.

भारतात या फोनची किंमत 60 हजार ते 92 हजार इतकी असणार आहे. आयफोन 7च्या 32 जीबी हँडसेटची किंमत 60 हजार रुपये, 128 जीबी हँडसेटची किंमत 70 हजार रुपये तर 128जीबी हँडसेटची किंमत 82 हजार रुपये असणार आहे. आणि 256 जीबी हँडसेटची किंमत आहे 92 हजार रुपये.

या फोनची खासियत अशी आहे की, त्याला स्लिम बनवण्यासाठी त्यातला ऑडिओ जॅक काढून टाकण्यात आलाय. याशिवाय हा आयफोन लाइटनिंग कनेक्टरवर काम करेल. त्यात वायरलेस हेडफोनही वापरता येतील.
या फोनचा आकार आणि वजन पहिल्या आयफोन 7सारखीच आहे. फक्त डिझाईन आणि फीचर्स यात बदल केले गेलेत. ऍपलनं भारतात ऑनलाइन विक्रीसाठी फक्त फ्लिपकार्टसोबतच करार केलाय. 29 सप्टेंबरपासून या दोन्ही आयफोन्सची ऑर्डर घेणं सुरू झालंय.

 कसा आहे आयफोन 7?
- किंमत : 60 हजारांपासून सुरुवात
- रंग : ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्वर, गोल्ड आणि रोज गोल्ड
- स्टोअरेज – 32 जीबी,128 जीबी, 256 जीबी
- स्क्रीन – 4.7 इंच (आयफोन 7 प्लस 5.5 इंच)
- वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट
- होम बटणमध्ये सुधारणा, टच सेंसिटिव्हिटीचा आधार
- स्मार्ट कॅमेरा
- सुधारित लेन्स, फोटोमध्ये व्यक्ती आणि वस्तूमधला फरक कॅमेराला कळतो
- 7 प्लसमध्ये 2 कॅमेरे. एक नॉर्मल, दुसरा टेलिफोटो कॅमेरा
- हेडफोन जॅक नाही
- वायरलेस एअरपॉडस्‌चा पर्याय
- अॅपल 10 फ्युजन प्रोसेसर
- 2 तास अधिक बॅटरी लाईफ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा