राज्यात नेत्यांची भाषा घसरली!

October 8, 2016 1:16 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर : राज्याच्या राजकारणात सध्या पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दोन महिला आपल्या आक्रमक भाषी शैलीमुळे चांगल्यात चर्चेत आल्या आहेत. पंकजांनी नामदेवशास्त्रींना दसरा मेळाव्यानंतर पाहून घेते, अशा स्वरूपाची धमकीची भाषा वापरलीय तर सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच खुलं आव्हान दिलं आहे. त्यासाठी त्या दसनंबरी नागिन व्हायलाही तयार आहेत. बरं हे कमी काय म्हणून मुख्यमंत्र्यांनीही एका हिंदी मुहावऱ्याचा आधार घेऊन विरोधकांना थेट गाढवांचीच उपमा देऊन टाकली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफ करा, कोपर्डी घटनेतीला मुलीला न्याय द्या, अशी मागणी केली तर आपले काय चुकले? मुख्यमंत्री त्यावर कोणतीच कारवाई न करता आम्हाला कुंडल्यांचा धाक दाखवीत आहेत.विरोधकांच्या कुंडल्या काढण्याची भाषा करणारे हे मुख्यमंत्री आहेत की ज्योतिषी असा खडा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. फक्त एवढंच बोलून सुप्रिया सुळे थांबल्या नाहीतर तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोणत्याही धमकीला आपण घाबरणार नाही. तुम्ही महिलांच्या नादी लागाल एक लक्षात ठेवा, एक महिला तुम्हाला नक्कीच दसनंबरी नागीन दाखवेल, असं बेधडक विधान सुप्रिया सुळेंनी जळगावात केलं आहे.

Supriya and Deven

तर हिंगोलीत महिला बचत गट मेळाव्याचं निमित्त साधून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला केला. 50 वर्ष राज्य करणारे अवघ्या 2 वर्षात आमच्याकडे हिशोब मागतात असं सांगताना. उदाहरणासाठी त्यांनी एक शेर सादर केला. या त्यांनी विरोधकांना ‘आजकल गधे भी गुलाब मांगते है’ असं म्हणत त्यांनी माध्यमातून विरोधकांना   चक्क गाढवाची शेरोशायरीच्या उपमा दिली आहे.

गेले काही दिवस सुप्रिया सुळेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते थेट मुख्यमंत्र्यावर टीका करत होते. मात्र या टीकेवर फारशी टोकाची टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती. मात्र काल हिंगोलीतल्या या कार्यक्रमात त्यांनी सारी कसर भरून काढली.

ज्येष्ठ पवार बोलायला मिश्किल आहेत याची प्रचिती महाराष्ट्रानं अनेक वेळेस घेतलीय पण त्यांची पोरही अंगाला मिर्च्या झोंबतील असं बोलतं हे मात्र फार कमी वेळेस दिसलंय. तशा सुप्रिया सुळे ह्या तिखट बोलायला प्रसिद्ध आहेतच पण मर्यादा कधी त्या ओलांडत नाहीत. तशा दिल्लीकर नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुप्रिया महाराष्ट्रातल्या राजकारणात मात्र चांगलाच रस घेताना दिसतायत आणि त्यांच्या निशाण्यावर आहेत मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करायची त्यांनी एकही संधी सोडलेली नाही.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्च्यांचं वादळ अजुन थंडावतंय असं वाटत असतानाच महाराष्ट्रात आणखी एका राजकीय वादळाला सुरुवात झालीय. हे वादळ आहे भगवानगडाच्या वादाचं. हा वाद महंत आणि पंकजा मुंडेत सुरु झाला पण आता तो पंकजाच्या राजीनाम्यापर्यंत पोचल्याचं दिसतंय. पंकजा मुंडेंनी, परळीमध्ये तुम्हाला खेटायला वगैरे…पण आहेतच माझे लोकं…लोकांना मारहाण करून त्यांच्यावरच केस दाखल करून लोकांना तडीपार करता येतं…” असं म्हटलं आहे. एवढचं नाही तर भगवानगडावर येणारच अशी ठाम भूमिका घेत पंकजांनी थेट नामदेवशास्त्रींनी पाहुन घेत अशी धमकीच दिलीये.

राजकारणातही काही मर्यादा असतात. कट्टर राजकीय विरोधकांवरही टीका करताना भान बाळगणारे नेते या देशाने आणि राज्याने बघितले आहेत. पण सध्या राजकारणात सध्या एकमेकांवर टीका करण्याची पातळी सोडली जात आहे. त्यामुळे लोकशाही समृद्ध होत असली नेत्यांच्या भाषणांची मात्र अधोगती होत आहे असेच म्हणावे लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा