आंदोलनाचं श्रेय लाटण्याचा मनसे आणि शिवसनेचा प्रयत्न

October 17, 2008 5:09 AM0 commentsViews: 5

17 ऑक्टोबर,आयबीएन-लोकमत ब्युरो रिपोर्ट – जेटने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राजकीयपडसाद लगेचच उमटायला सुरुवात झाली आहे. आता कर्मचा-यांच्या या यशाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि मनसे यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र कुठल्याही राजकीय दबावामुळं आपण निर्णय घेतला नसल्याचं नरेश गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.भवितव्य धोक्यात आलेल्या जेटच्या कर्मचा-यांनीराज ठाकरे यांना मदतीचं साकडं घातलं. त्यानंतर मनसेच्यापदाधिका-यांनी जेटच्या अधिका-यांची भेट घेतली आणि चर्चा केली. याचबरोबर कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेतला नाही तर जेटचं एकही विमान मुंबईतून उडू देणार नाही असा इशाराही मनसेनेदिला होता. तर जेटमध्ये अधिकृत कामगार संघटना असलेल्या शिवसेनेनं जेटबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवल्याचा दावा केलाय. मात्र नरेश गोयल यांनी आपल्यावर कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं सांगत हे दोन्ही दावे नाकारले आहेत.दरम्यान जेटला हा निर्णय शिवसेनेच्या दबावामुळेच घ्यावा लागल्याचा दावा उध्दव ठाकरे यांनी केलाय. तर मनसेच्या आक्रमकतेमुळेचजेटला निर्णय घ्यावा लागल्याचा दावा मनसेने केला आहे. दोन दिवसांत सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेणा-या या मुद्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. तर या कर्मचा-यांना कामावर परत घेताना कायम कर्मचा-यांचा एकही पैसा कमी होता कामा नये, तसंच कर्मचा-यांना दिवाळीचा बोनसही मिळावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आता कर्मचारी कॉस्ट कटींगच्या धोरणात कंपनीची मदत करतात की बोनससाठी नवा संघर्ष उभारतात हे थोड्या दिवसांतच स्पष्ट होईल.

close