भगवानगड वादात भाजपा पूर्णपणे पंकजाच्या पाठिशी

October 8, 2016 3:12 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर :  भगवानगडावरुन राजकारण रंगत असून ऑडिओ क्लिपमुळे पंकजा मुंडे यांची विरोधकांकडून कोंडीदेखील केली जात आहे. तर भाजपने मात्र पंकजा मुंडे यांना साथ दिली आहे. पंकजा मुंडे यांना या प्रकरणात अडकवले जात असून भाजप पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे असे भाजपने स्पष्ट केले आहे. तर महादेव जानकर यांनीदेखील पंकजा मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

jankar on Pankaja

दस-याला भगवान गडावरील कार्यक्रमावरुन सध्या वाद रंगला आहे. पंकजा मुंडे यांनी दस-यानंतर नामदेवशास्त्रींना दसरा मेळाव्यानंतर पाहून घेते असा धमकीवजा इशारा दिल्याने वादात भर पडली आहे. धनंजय मुंडे यांनीदेखील यावरुन पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांचे विरोधक सक्रीय होताच भाजपही त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. पंकजा मुंडे या कोणाच्या विरोधात बोलल्या नाहीत. पंकजा मुंडे यांना टार्गेट केले जात असून मी स्वतः यंदा पंकजा मुंडेंसोबत भगवान गडावर जाणार आहे असे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.  भगवान गडावर आजवर कोणीही राजकीय भाषण केले नाही. भगवान गडावर सर्व समाजाची लोक जातात. 20 वर्षांपासून भगवान गडावर भाषण होत होत, गेल्या 5 वर्षात पंकजाताईंची भाषणं होत होती, मग आत्ताच विरोध का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  पंकजा मुंडे यांच्या पाठीशी 95% बहुजन समाज असताना त्यांना रोखण्याचं काय कारण आहे असंही त्यांनी विचारलं आहे.

महादेव जानकर यांनीदेखील पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला आहे. पंकजा मुंडेंनी कोणालाही धमकी दिलेली नाही. त्यांना बदनाम करण्यासाठी कोणातरी ही योजना आखली आहे, परंतू विरोधकांना यात यश मिळणार नाही. त्यामुळे भगवान गाडावर पंकजा ताईंचं भाषण झालंच पाहिजे असंही जानकर म्हणालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा