मॅथ्यू चक्रीवादळाचा फ्लोरिडालाही तडाखा

October 8, 2016 6:04 PM0 commentsViews:

ct-photo-gallery-hurricane-matthew-east-coast-20161005

08 ऑक्टोबर : हैतीमधलं मॅथ्यू चक्रीवादळ अमेरिकेत फ्लोरिडाच्या किनार्‍यालाही धडकलं. या वादळामुळे 4 जणांचा मृत्यू ओढवलाय. या वादळामुळे इथे पूर येण्याचा धोका आहे.

वादळी वारे, उंचच उंच लाटा यामुळे इथे जास्त नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. सुमारे 15 लाख रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

फ्लोरिडाच्या रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झालंय. रहिवाशांच्या स्थलांतरामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅमही झालंय. या वादळाचा जोर वाढला तर या नैसगिर्क आपत्तीला तोंड देण्यासाठी फ्लोरिडा सज्ज आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा