हैतीमधल्या वादळात 900 जणांचा बळी

October 8, 2016 6:46 PM0 commentsViews:

Haiti harricane132

08 ऑक्टोबर : हैती देशाची मॅथ्यू चक्रीवादाळामुळे पार वाताहत झालीय. या वादळात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 900 वर गेलाय आणि हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. वादळामुळे जिथे जास्त नुकसान झालंय तिथे मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टर्स किंवा बोटीने जावं लागतंय. त्यामुळे पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचं आव्हान आहे. अमेरिकेच्या बचावपथकांच्या तुकड्या हैतीमध्ये वादळात अडकलेल्यांची सुटका करतायत. आफ्रिकेतल्या याच हैती दैशाला 2010 मध्ये भूकंपाचा हादरा बसला होता. या भूकंपात 1 लाख लोकांचा बळी गेला होता. आता पुन्हा 6 वर्षांनी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलाय.  हैतीचं मॅथ्यू चक्रीवादळ पुढे अमेरिकेत फ्लोरिडालाही थडकलंय. वादळाचा जोर आता ओसरेल, असं म्हटलं जात असलं तरी किनारपट्टीवरचा धोका अजूनही कमी झालेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा