मोनोरेल्वेला वीजपुरवठा करणारी केबल आली खाली !

October 8, 2016 8:31 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर :  मोनोरेल्वेला वीजपुरवठा करणारी केबल आज दुपारी दीड वाजताच्या सुमाराला तिच्या कव्हरसह खाली आली. ही लोंबकळणारी केबल म्हणजे मोनोरेल्वेचा ट्रॅक आहे, असं वाटल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. आधीच करी रोडच्या रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यातच या अपघातामुळे मोनोरेल्वेच्या सुरक्षेबद्दल मुंबईकरांना शंका वाटतेय.

Monorail23

एल अँड टीनं ही सध्या लटकणारी केबल दोरानं बांधण्याचं काम हाती घेतलंय. वीजपुरवठा पूर्णपणे सुरू असताना ही केबल खाली असती तर शॉक लागून दुर्घटना झाली असती. कारण या केबलमधून 22 हजार व्होल्टचा वीजपुरवठा होत असतो. मोनोरेलचं केबलचं काम नुकतंच संपलंय. असं असतानाही ही दुर्घटना कशी घडतेय, असा प्रश्न विचारला जातोय.

मोनोरेल्वेचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय, असं कॅगच्या अहवालातही म्हटलंय. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका मुंबईकरांना बसतोय. मोनोरेलच्या केबलदुरुस्तीमुळे सध्या करी रोडचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा