पंकजांपाठोपाठ नामदेवशास्त्रींची ऑडिओ क्लीप व्हायरल

October 8, 2016 9:13 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर :  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली. त्यामुळे भगवानगडावरुन सुरू असलेल्या वादानं एक नवं वळण घेतलंय. त्यातच आता महंत नामदेवशास्त्री यांचीही एक ऑडिओ क्लिप लोकांसमोर आलीय. महंत नामदेवशास्त्रींनीही आम्हाला दमबाजी केलीय, असा पंकजा मुंडे समर्थकांचा दावा आहे. एका स्थानिक पत्रकाराशी त्यांचं फोनवरून हे संभाषण झालंय, असंही समोर आलंय.

alsday

पाहा, काय म्हणातायत नामदेवशास्त्री… !

मी नामदेव शास्त्री आहे, माझ्यामागे पण लोक आहेत. मी सत्तेशी लढतोय. मी माणसं थांबवलीयत. जरी तुम्हाला तुमच्या नगरचं कळत असेल ना तरी मी फाडून खाईल एखाद्याला. एवढी ताकद आहे आमची. नाहीतरी लोक एवढे खवळले आहेत ना. कोयता त्यांना समजत नाही काय ? माझं ऐका, तुम्ही या भानगडीत पडू नका. तुम्ही मध्ये भाग घेऊ नका, मला रमेश घोले काय करतो, अजून कोण काय करतं हे सगळं लक्षात आहे. मी तर तयारीत आहे, माणसं थांबवलीयत उलट मी. तुमच्या लक्षात येत असेल की हा परिसर कसा आहे. काही त्रास घेऊ नका, मी मजबूत आहे.तुम्ही ज्या कुळात जन्मला असेल ना तो घुले. तुम्ही असेल, मी असेल…कारण एवढा चांगला गड केला आहे ना…त्या बावळट लोकांची सेवाच केली.कारण आपल्या आईबाबांचा उध्दार, भगवानबाबांचा उद्धार केलाच पाहिजे. आपलं खानदान आहे ते. मी कशाला समजवू, बस तुम्ही आता समजून घ्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा