ट्विटरवरही ‘#एकमराठालाखमराठा’चा एल्गार

October 9, 2016 2:25 PM0 commentsViews:

maratha_morcha_trend09 ऑक्टोबर : राज्यभरात लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्च्याचं वादळ आता ट्विटरवरही धडकलंय. आज ट्विटरवरही एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यास मिळालाय. ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे. 1 लाख ट्विटचा टप्पा पार करून सध्या मराठाक्रांती मोर्चा हा हॅशटॅग आठव्या स्थानावर आहे.

मराठा मोर्च्या आयोजकांकडून आज ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा या हॅशटॅगच्या रुपात मोर्चा काढण्याचं आयोजन केलंय. सकाळी 10 वाजेपासून या ट्विटर मोर्च्याला सुरुवात झाली. पण दुपारी 1.30 च्या सुमारास अखेर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेडिंगला आला. आधी 10 व्या आणि नंतर आठव्या स्थानावर ट्विटरवर ट्रेंडिंगला आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा