विराट-अजिंक्य खेळी, भारताने उभारला धावांचा डोंगर

October 9, 2016 2:44 PM0 commentsViews:

virat_new23इंदोर, 09 ऑक्टोबर : न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने खणखणीत द्विशतक ठोकले आहे.  विराटने 207 रन्स करून द्विशतक झळकावले. 211 रन्सवर विराट आऊट झाला.  तर अजिंक्य रहाणेनंच मात्र द्विशतकाचं स्वप्न भंगलं. 188 रन्सवर रहाणे आऊट झाला.  विराटच्या द्विशतक आणि रहाणेच्या दमदार खेळीवर दुसऱ्या दिवशी भारताने 511 धावांचा डोंगर रचला.

भारताने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब राहिली. तिसऱ्या कसोटीत पहिल्या सत्रात मुरली विजय आणि गौतम गंभीर झटपट आऊट झाले. मुरली विजय 10 तर गौतम गंभीर 29 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सत्रात चेतेश्वर पुजाराने 41 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाचा कमान सांभाळात 456 रन्सचा टप्पा गाठला. डबल सेंच्युरी झळकावून विराट 211 रन्सवर आऊट झाला. त्यापाठोपाठ द्विशतकाकडे वाटचाल करणार अजिंक्य रहाणे 188 रन्सवर आऊट झाला.   या आधी तीन कसोटी मालिकेत भारताने आधीच दोन सामने जिंकत मालिका खिश्यात घातली आहे. या कसोटी जिंकल्यानंतर भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा