अहमदनगरमध्ये चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न, नराधम अटकेत

October 9, 2016 3:52 PM0 commentsViews:

rape-victims-09 ऑक्टोबर : अहमदनगरला पारनेर तालुक्यातील पळशीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी 48 वर्षीय पोपट साळवे या नराधमला अटक करण्यात आलंय.

पीडित 8 वर्षांची मुलगी बहीण आणि भावासह घराच्या जवळ खेळत होती. त्यावेळी पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात पीडितेच्या नातेवाईकाच्या गाडीचा आवाज आल्यानं आरोपी  पळाला. शनिवारी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या नातेवाईकांनी या नराधमाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा