2011 मध्येही झाला होता सर्जिकल स्ट्राईक, पाक सैनिकांचे शिर आणले होते कापून !

October 9, 2016 6:57 PM0 commentsViews:

 surgical strike 20111

09 ऑक्टोबर : भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा अजूनही सुरूच आहे. 2011मध्येही असाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, असं वृत्त ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलंय.

कुपवारामध्ये गुगलधर या ठिकाणी 30 जुलै 2011 रोजी दुपारच्या वेळी पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला. त्यामध्ये 3 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यापैकी हवलदार जयपाल सिंग अधिकारी आणि लान्स नाईक देवेंदर सिंग यांचे शिर कापून पाकिस्तानी सैनिक त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. या घटनेनंतर भारतीय सैन्यातर्फे बदल्याची कारवाई करण्यात आली.

लष्करानं ऑपरेशन जिंजर ही मोहीम आखली. त्यामध्ये पाकिस्तानातल्या किमान 7 तळांची टेहेळणी करण्यात आली. 30 ऑगस्ट 2011 रोजी प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. 25 सैनिकांनी 29 ऑगस्टच्या रात्री नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तानच्या तळावर हल्ला चढवला. त्यामध्ये 4 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यापैकी 3 सैनिकांचं शिर कापून, ते सोबत घेऊन भारतीय सैनिक परतले. ही मोहीम आखणारे आणि ती राबवणारे निवृत्त मेजर जनरल एस. के. चक्रवर्ती यांनी ‘द हिंदू’शी बोलताना या घटनेला दुजोरा दिलाय. तो हल्ला अलिकडच्या काळातला सर्वात भीषण हल्ला मानला जातो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा