बॉक्स ऑफिसवर धोणीची ‘सेंच्युरी’

October 9, 2016 8:29 PM0 commentsViews:

M.S.-Dhoni-biopic09 ऑक्टोबर : ‘एम.एस. धोणी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ‘शतक’ ठोकलंय. शनिवारी या सिनेमानं 5 कोटी 20 लाखांची कमाई केली आणि सिनेमा 100 कोटींच्या पुढे गेलाय.

बॉक्स ऑफिसवर एम.एस.धोणीची आता 103 कोटी रुपये कमाई झालीय. सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता. पहिल्या दिवसापासून सिनेमाची घोडदौड सुरूच होती. पहिल्याच दिवशी सिनेमानं 21.30 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. क्रिकेटप्रेमी आणि धोणीचे फॅन्स यांना हा सिनेमा खूप आवडतोय. शिवाय या आठवड्यात बॉलिवूडचा मोठा सिनेमा रिलीज झाला नाही. याचाही फायदा सिनेमाला होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा