नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा मोर्चा

October 9, 2016 8:46 PM0 commentsViews:

nagar_marathaऔरंगाबाद, 09 ऑक्टोबर : राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात काढलेल्या यशस्वी मोर्चांनंतर आता मराठा समाज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशावर मोर्चा काढणार आहे. 14 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे.

आज औरंगाबादला मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. मुंबईच्या मोर्चाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात येतंय. आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यातल्या बदलाची मागणी मराठा समाजाकडून करण्यात येतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा