अपंग दलित मुलीला जिवंत जाळले

April 22, 2010 2:53 PM0 commentsViews: 6

22 एप्रिल

हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात एका अपंग दलित मुलीला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. यात तिचे वडीलही जखमी झाले आहेत.

काही लोकांनी दलित समाजाची घरे पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रसंग घडला. मिर्चापूर नावाच्या गावात ही घटना घडली.

एका महिलेला काही मुले छेडण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा गावातील लोकांनी एकत्र येऊन त्या मुलांना चोप दिला. तेव्हा या मुलांनी लोक जमा करून दलित समाजाची घरे पेटवून दिली.

close