जाणून घ्या, ताक पिण्याचे फायदे !

October 9, 2016 9:42 PM0 commentsViews:

घरोघरी सहज उपलब्ध असणारं ताक खूपच उपयोगी आहे. ताकाचा एक प्याला माणसाला आरोग्यवान ठेवतो. पाहू या ताक प्यायल्यानं काय फायदे होता ते…

1. पित्त किंवा ऍसिडिटी होत असेल तर जरुर एक ग्लास ताक प्यावं. ताकानं ऍसिडिटीचा त्रास निघून जातो.
2. अपचनावर ताक गुणकारी आहे.
3. बद्धकोष्ठता असेल तरीही ताक प्यायल्यानं बराच फायदा होतो.
4. ताकामध्ये कॅल्शियम असतं. ताक प्यायल्यानं हाडं मजबूत होतात.
5. ताकामध्ये प्रोटिन,पोटॅशियम, बी व्हिटॅमिन भरपूर असतं. त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते.
6. ताकामुळे शरीरातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
7. ताकामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर ते भरून निघतं.
8. जेवणानंतर ताक प्यायल्यास पचनशक्ती चांगली होते. खाल्लेलं अन्न चांगलं पचतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा