आदिवासी हिताय की ‘आदिवासी दुखाय’!

October 9, 2016 9:51 PM0 commentsViews:

विजय राऊत, विक्रमगड, 09 ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळांमधील असुविधांमुळे हजारो विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. साखरे इथल्या आश्रमशाळेत 23 मुलं आजारी पडलीयेत. यातल्या एका विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय.

adivasi_pkgपालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या साखरेच्या आश्रमशाळेत, ‘आदिवासी हिताय’ असं लिहलेला बोर्ड आहे.. बोर्ड जरी असा लिहला असला तरी परिस्थिती अशी नाही. आश्रमशाळेतल्या स्वयंपाक घरात घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं. परिसरातही कमालीची अस्वच्छता आहे. याचा परिणाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झालाय. साखरेच्या आश्रमशाळेतली 23 मुलं आजारी पडलीयेत. यातल्या कौशल्या भरसट या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. तर 7 जणांना टायफॉईडची लागण झालीये.

साखरेच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची अबाळ होते. शिवाय शिक्षकांचं मुलांवर लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. आदिवासी विकास मंत्री औपचारिकता म्हणून आले आणि कारवाई करू असं थातूरमाथूर उत्तर देऊन निघून गेले.

शासकीय आश्रमशाळांमधील सोईसुविधांबाबत नेहमीच ओरड होत असते. मात्र या सोईसुविघा पुरवण्याबाबत स्वतः आदिवासी असलेले मंत्रीही गंभीर दिसत नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा