दादर :ज्ञानरुप इमारतीची आग आटोक्यात, 6 जणांची सुखरुप सुटका

October 9, 2016 9:30 PM0 commentsViews:

daar_fireमुंबई 09 ऑक्टोबर : प्रभादेवी परिसरातील ज्ञानरुप इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून 6 जणांची सुखरुप सुटका केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सिद्धिविनायक मंदिराच्या मागे असलेल्या ज्ञानरुप इमारतीत सिलेंडर स्फोटामुळे आग लागली होती. या दुर्घटनेमुळे इमारतीत सहा जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन वेळीत आग आटोक्यात आणली आणि सहाही जणांची सुखरुप सुटका केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मालमत्तेचं नुकसान झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा