नामदेव शास्त्रींची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल

October 10, 2016 9:14 AM0 commentsViews:

10 ऑक्टोबर :  पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री महंत यांच्यातला वाद काही क्षमायचं नाव घेत नाहीय. गडाचे मंहत नामदेव शास्त्री यांच्या भाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.दसरा मेळाव्याच्या दिवशी गर्दी जमल्यास लोकांना कसं परतून लावायचं याबद्दलचं मार्गदर्शन शास्त्री या क्लीपमध्ये करत आहेत.

दसऱ्याला गडावर कुणालाही येऊ द्यायचं नाही. आपण कोणत्या घराण्याचे सेवक नाही आहोत. आपण बांगड्या भरल्या नाहीत, अशी विधानं नामदेवशास्त्रींनी या क्लिपमध्ये केली आहेत.

दरम्यान, या क्लिपची सत्यता IBN लोकमतनं पडताळून पाहिलेली नाही.

alsday

 काय म्हणाले नामदेव शास्त्री?

“आपली लोकं एवढी हलकट आहेत याचा अंदाज नाही आपल्याला. जे लोक पत्रकार परिषदा घेतात, गडाच्या विरोधात बोलतात, फेसबुकवरही उलटसुलट लिहतात, तीच ही लोक. बीड, परळी इथले लोक दादागिरी करण्याचा प्रयत्न करतील. सहजासहजी सगळ्यांनी ऐकलं तर ठीक आहे. नाही ऐकलं तर माझा निर्ण्य असा आहे की दसऱ्याच्या दिवशी आपल्या सगळ्या मुलांनी ड्रेसकोड घालायचा. मग राणेगाव असल, घोरेगाव असल, पारगाव असल सगळ्यांनी एका लाइनमध्ये उभं राहायचंय.  त्यादिवशी ट्रॅफिक अडवायचं नाही. येऊ द्या ना गाड्या वरती. होऊ द्या ट्रॅफिक जाम. आणि गडावर आपला माणूस सोडून कुणी दिसला की त्याला बाहेर निघायला सांगा. गडावर कुणालाच थांबू द्यायचं नाही, काय काम आहे ते सांग अस विचारायचं आणि बाहेर निघायाला सांगायचं. आपण काय कुण्या धरण्याचे सेवक नाहीत. एवढ्या बांगड्या भरलेल्या नाहीत आपण.  आणि त्यांनी काय ठरवायचं.. आपण जाहीर करणारे, भगवान गडावर कुणी यायचं नाही. अर्धे लोक इथेच गायब होतील. राहिले फक्त चमचे. त्यांनाही चला बाहेर म्हणायचं, जसजशी परिस्थिती बदलेल, तसतसे तुम्हाला अपडेट येत राहतील, आणि आपलं हे शेवटचं पाऊल आहे.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा