जम्मू काश्मीरमधील पम्पोरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

October 10, 2016 12:59 PM0 commentsViews:

proxy

10 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर भागात सकाळपासून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. काश्मीरच्या ईडीआय या सरकारी इमारतीत शिरलेल्या दहशतवाद्यांना लष्करानं घेरलं असून त्यांच्यात गोळीबार सुरू आहे.

सकाळी साडेसात वाजता दोन ते तीन दहशतवादी पम्पोर भागात शिरल्याची माहिती लष्कराच्या जवानांना मिळाली. त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. ही चकमक अजूनही सुरू आहे.

गेल्या 2 आठवड्यांमधला हा चौथा अतिरेकी हल्ला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा