भगवानगडाला छावणीचं स्वरूप, महंतांच्या समर्थकांना नोटिसा

October 10, 2016 2:47 PM0 commentsViews:

Bhagwan Gad

10 ऑक्टोबर :  दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या भाषणावरुन निर्माण झालेल्या वादामुळे भगवानगडावर  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्याता आहे.  त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नामदेवशास्त्रींच्या 500 समर्थकांना नोटीस बजावली आहे. तसंच भगवानगडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

कोणत्याही परिस्थितीत दसरा मेळाव्यात भागवान गडावर भाषण करणारच असा निर्धार समर्थकांनी केला आहे. त्यासाठी मोठे नियोजन सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावरुन राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यात पंकजा मुंडे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यात पंकजा मुंडे यांनी, ‘नामदेव शास्री यांचे काय करायचे ते दसरा मेळाव्यानंतर पाहू’ असं म्हटल्याने हा  वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे गडावर सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिसांनी नामदेवशास्त्रींच्या 500 समर्थकांना कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. तर भगवानगडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गडाला अक्षरशः छावणीचे स्वरुप आले आहे. एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३२५ पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील मागवलेले अतिरिक्त पोलीस बळ भगवान गडावर तैनात असतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा