…नाहीतर कोर्टात हजर करू,कोर्टाने राऊतांना खडसावलं

October 10, 2016 5:34 PM0 commentsViews:

court_on_Rautमुंबई, 10 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संपत्ती वाद प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना हायकोर्टाने खडसावलं. पुढच्या वेळी गैरहजर राहिले तर कोर्टात हजर करू अशी तंबी न्यायाधिशांनी संजय राऊतांना दिली.

बाळासाहेबांच्या संपत्तीच्या वादातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं संजय राऊतांना हायकोर्टानं फटकारलं. या प्रकरणी साक्षीदार म्हणून सामनाचे संपादक संजय राऊत गैरहजर राहिले. मुंबईत नसल्याचे संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितलं. संजय राऊत हे जर पुढच्या तारखेला हजर राहिले नाही तर त्यांना कोर्टात आणले जाईल. त्यांना कोर्टात उभे केले जाईल याची काळजी कोर्ट घेईल असं न्यायाधीश गौतम पटेल यांनी म्हटलं आहे. ही एकमेव संधी कोर्ट देत आहे असंही न्यायाधीशांनीे स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा