अखेर पंकजा मुंडेंच्या सभेला परवानगी

October 10, 2016 9:30 PM0 commentsViews:

pankaj_bhgvangad10 ऑक्टोबर :  अखेर पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी सभा घ्यायला परवानगी देण्यात आलीय. हेलिपॅडच्या जवळ असलेल्या जागेवर पंकजा मुंडे सभा घेऊ शकतात, असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय.

‘मी भगवानगडावर येतेय आणि तुम्ही?’ असं आवाहन करुन पंकजा मुंडेंनी भगवानगडावर येणारच असा निर्धार केलाय. मात्र, भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडेंना विरोध केला. मध्यंतरी नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांची वादग्रस्त ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली. या वादाची खबरदारी घेत पोलिसांनी भगवानगडावर कडक सुरक्षा तैनात केलीये.

भगवानगडावरील दसरा मेळाव्याला सुरुवातीला पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली होती. भगवानगडाच्या आतमध्ये मेळावा घेण्यास जिल्हा प्रशासनानं मनाई केली होती आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. मात्र आता प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतलीये. पंकजा मुंडेंच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी सभा घेता येणार आहे.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा