करमाळ्यात लोकसहभागातून जलक्रांती, बंधारा भरला तुडुंब

October 10, 2016 11:13 PM0 commentsViews:

10 ऑक्टोबर : करमाळामधील गावकऱ्यांनी लोकसहभागातून बांधलेल्या ओढ्यात परतीच्या पावसामुळं पाणी साचलंय. यामुळे गावकरी समाधानी आहेत. या गावकऱ्यांना खरंतर पंढरपुरात मठ बांधायचा होता. मात्र, सततच्या दुष्काळाचं सावट पाहाता लोकसहभागातून गावातील ओढ्याचं खोलीकरण आणि रूंदीकरणाचं काम केलं. तब्बल 11 किलोमीटरचं हे काम इथल्या गावकऱ्यांनी केलंय. त्यामुळे आता परतीच्या पावसामुळे या ओढ्यात भरपूर पाणी साचलंय. विशेष म्हणजे शासनाच्या एकाही पैशाची वाट न पाहाता 100 टक्के लोकसहभागातून हे काम करण्यात आलं आहे.karmala32

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी गाव. तसं हे गाव सतत दुष्काळाच्या पाण्याच्या झळा सोसणारे गाव. एकूण भौगलिक क्षेत्राच्या अर्धा भाग हा खडकाळ. गावाच्या शेतीचे एकूण क्षेत्रफळ सहा हजार एकशे पंचवीस एकर. आणि पुर्णपणे पावसाच्या जिवावर शेती अवलंबून. पावसाच्या पडलेल्या पाण्याचा एक थेंबही गावाच्या शिवारात थांबत नव्हता.

एके दिवशी याच गावचे गाव कामगार तलाठी शामवालेकर यांनी गाव जर बागायत करायचे असेल तर गावातून वाहुन जाणारे पाणी थांबवले पाहिजे आणि थांबलेले पाणी मुरले पाहिजे. तरच गावची दुष्काऴापासून कायमची सुटका होईल. यावर एकच रामबाण उपाय गावच्या ओढ्याचे खोलिकरण आणि रुंदीकरण केलं. आणि तलाठी भाऊसाहेबाने गावातील तीन राजकीय गट एवढ्या कामासाठी एकत्र करुन संकल्पना राबवण्याचे ठरले. याला आता खरी गरज होती ती पैशाची. मग गावकऱ्यांनी त्यांच्याकडे देवस्तानच्या कमिटीकडे असणारे दहा लाख रुपये या कामासाठी दिले. काम पूर्ण केले, आता या ओढ्यात पाणीच पाणी पाहुन केलेल्या कामाचा आनंद होत असल्याचे सांगितलं जातं.

या लोक वर्गणीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी तब्बल अकरा किलेमीटरच्या ओढा खोलिकरणाचे काम पूर्ण केलं. राज्यातील असा एक हा शंभर टक्के लोक सहभागातील प्रकल्प आहे. या लोक सहभागाच्या प्रकल्पाचा आदर्श इतर पाणी टंचाईग्रस्त गावांनी घेतल्यास दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होणार नाही. वास्तविक सावडी गावाने जे केले ते कौतुकास्पद तर आहेच पण तेथील ग्रामस्थांनी जे काम केले आहे ते अत्यंत प्रेरणा देणारे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा