चेन्नई सुपर फायनलमध्ये

April 23, 2010 9:47 AM0 commentsViews: 4

23 एप्रिल

महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये चेन्नईने डेक्कनचा 38 रन्सने पराभव केला.

आता फायनलमध्ये चेन्नईची गाठ पडेल ती सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सशी. चेन्नईने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण टॉप ऑर्डर झटपट कोसळली. पण एस बदि्रनाथ आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने चेन्नईची इनिंग सावरली.

या दोघांनी हाफसेंच्युरी पार्टनरशिप करत टीमचा स्कोअर वाढवला. पण डेक्कनला हे माफक आव्हानही पेलता आले नाही. डेक्कनचे प्रमुख बॅट्समन सपशेल फ्लॉप गेले.

अवघ्या 50 रन्समध्येच डेक्कनचे 5 प्रमुख बॅट्समन पॅव्हेलिअनमध्ये परतले. आणि इथेच डेक्कनचा पराभव निश्चित झाला.

डेक्कनची टीम 104 रन्सवर ऑलआऊट झाली. आता मुंबई आणि चेन्नई दरम्यान येत्या 25 तारखेला आयपीएलची फायनल मॅच रंगेल.

close