एअर इंडियाचा कर्मचा-यांसाठी ऐच्छिक सुट्टीचा नवा प्रस्ताव

October 17, 2008 6:18 AM0 commentsViews: 7

17 ऑक्टोबर,आयबीएन-लोकमत ब्युरो रिपोर्ट – जेट एअरवेजने कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र , एअर इंडियाने कर्मचार्‍यांसाठी बिनपगारी रजेचा नवा प्रस्ताव मांडला आहे.कर्मचार्‍यांना 'ले ऑफ' देण्याऐवजी त्यांनी बिनावेतन तीन ते पाच वर्षांची ऐच्छिक सुट्टी घ्यावी असा हा नवा प्रस्ताव एअर इंडियाने सुचवला आहे. या नव्या प्रस्तावाचा निर्णय एअर इंडियाने कर्मचार्‍यांवर सोपवला आहे. देशातली एअरलाईन्स इंडस्ट्री सध्या तोट्यात बुडाली आहे. आता कॉस्ट कटिंगसाठी जेट एअरवेजसारख्या काही कंपन्या कर्मचारी संख्या कमी करत आहेत, तर काही या मार्गावर जाण्याच्या विचारात आहेत. सरकारी एअरलाईन्स एअर इंडियाचा खर्चदेखीलबजेटबाहेर चालला आहे. 146 विमानांचा ताफा असणार्‍या एअर इंडियाकडे एकूण ( 30) तीस हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी दहा हजार कर्मचार्‍यांसाठी ही योजना आहे. एअर इंडियाचा कर्मचार्‍यांच्या पगारावरही खूप खर्च होत आहे. पण असं असलं तरी या कर्मचार्‍यांना कायमचं काढणार नसल्याचा भरोसा प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय. एअर इंडिया सरकारी कंपनी असल्याने कर्मचार्‍यांना काढून टाकणं नियमात बसत नाही. तेव्हा बिनापगारी रजा स्वीकारल्यानंतरही हे कर्मचारी सेवेतच असतील. काही काळाने आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर एअर इंडिया या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेऊ शकतं. नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडिया बोर्डामध्ये होणार्‍या पुढल्या बैठकीत बिनापगारी रजा किंवा व्हीआरएसचा ऑप्शन कर्मचार्‍यांपुढं ठेवला जाण्याची शक्यता आहे.

close