भाजपही अडकणार

April 23, 2010 10:00 AM0 commentsViews: 4

23 एप्रिल

आयपीएलच्या घोटाळ्यात आता भाजपसुद्धा अडकण्याची शक्यता आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीरपणे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

गेहलोत यांचे म्हणणे आहे की, आयपीएल कमिशनर ललित मोदींनी वसुंधरा राजेंच्या मदतीने राजस्थानमध्ये मोठा भूखंड घोटाळा केला आहे.

ललित मोदींनी खरेदी केलेल्या हवेलीचीही चौकशी राजस्थान सरकार करत आहे. चौकशीत उघड झाले आहे, याअगोदर ललित मोदी आणि त्यांची पत्नी यांनी घेतलेल्या दोन हवेल्या या सरकारी मालमत्ता होत्या.

त्यामुळे त्यांची खाजगी पद्धतीने विक्री होऊ शकत नाही.

close