जिओ मामि फेस्टिवलमध्ये प्रियांका चोप्राच्या मराठी ‘व्हेंटिलेटर’चा प्रीमियर

October 11, 2016 9:53 AM0 commentsViews:

_f3ca4b86-7012-11e6-afc2-14e084056c80

11 ऑक्टोबर: प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाचा प्रीमियर जिओ मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे. 18व्या जिओ मामि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 20 ऑक्टोबरपासून सुरू होतोय.

व्हेंटिलेटर सिनेमाद्वारे प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती करतेय. आशुतोष गोवारीकरची या सिनेमात भूमिका आहे. राजेश मापुसकरनं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

जिओ मामिमध्ये यावेळी मराठी टॉकीज हा खास भाग असेल. यात वक्रतुंड महाकाय, बायोस्कोप आणि राजवाडे अँड सन्स याही सिनेमांचा समावेश आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत जिओ मामि असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा