बीसीसीआय घालणार बहिष्कार

April 23, 2010 10:05 AM0 commentsViews: 6

23 एप्रिल

ललित मोदी आणि बीसीसीआय यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. 23 तारखेला होणार्‍या आयपीएलच्या पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

या सोहळ्याला बीसीसीआयचा एकही पदाधिकारी उपस्थित राहणार नाही. यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आयपीएलच्या वादामुळे या सोहळ्यावर बीसीसीआयने बहिष्कार घातला आहे.

मोदी आता बीसीसीआयविरुद्ध हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची 26 एप्रिलला बोलावलेली बैठक रद्द करण्यासाठी ते कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे समजते.

अशी बैठक फक्त आयपीएलच्या अध्यक्षाला अर्थात आपल्याला बोलावण्याचा अधिकार असल्याचा मोदींचा दावा आहे. पण बैठक होणारच असे बीसीसीआयने ठणकावले आहे.

close