आज जागतिक पुस्तक दिन

April 23, 2010 10:53 AM0 commentsViews: 87

23 एप्रिल

आज जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा केला जात आहे.

युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1995मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणार्‍या या चळवळीला या वर्षी 15 वर्षे पूर्ण होत आहेत.

वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी , म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे.

तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.

close