जवानांसोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं – अमिताभ बच्चन

October 11, 2016 12:46 PM0 commentsViews:

Amitabh_Bachchan_ANI_111016

11 ऑक्टोबर : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी पाकिस्तानच्या उरी हल्ल्यावर सडेतोडपणे आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणाले की, सीमेवर पाकिस्तानाकडून होणार्‍या हल्ल्यामुळे अख्ख्या देशात संतापाची लाट आहे. पण आपण जवानांसोबत खंबीरपणे उभं राहायला हवं. त्यांचं मनोबल वाढवायला हवं, असंही त्यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांनी आपल्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मीडियाशी संवाद साधला आणि सगळ्यांचे आभारही मानले.

मीडियानं पाकिस्तानी कलाकारांबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिलं नाही. सर्व कलाकारांचा सन्मान करायला हवा असं बिग बी म्हणाले. मीडियाशी दिलखुलास बातचीत करताना अमिताभ बच्चन यांनी आपला जन्म दसर्‍याचाच हेही सांगितलं. रात्री 12 वाजता आपल्या कुटुंबासोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला.

बॉलिवूडच्या या शहेनशहाला वेगवेगळ्या वाद्यांमध्ये रस आहे. त्यांना पियानो, सितार शिकायची आहे. याशिवाय आपल्याला गाणं शिकायचंय,असंही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा