‘परळी’च्या चमच्याने ‘बारामती’ची सुपारी घेतली, जानकरांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

October 11, 2016 5:35 PM0 commentsViews:

jankar_on_dmunde11 ऑक्टोबर : या चेल्या चपट्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात षड्‌यंत्र रचलंय. त्याचं नाव ‘बारामती’ आहे. आणि या बारामतीचा ‘परळी’चा चमचा आहे अशा शब्दात राज्यमंत्री महादेव जानकर यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवारांचा उल्लेख न करता घणाघाती टीका केली. तसंच या ‘बारामती’ची वाट लावल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशाराही जानकरांनी दिलाय.

भगवानगडावर आज पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र, त्याआधी महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी नेते धनंजय मुंडे यांच्यावर एकच हल्लाबोल चढवला. बारामतीच्या चमच्याने पंकजा मुंडेंच्या विरोधात षडयंत्र रचलंय. भगवान बाबांची शपथ घेऊन सांगतो या ‘बारामती’ची वाट लागल्याशिवाय जानकर थांबणार नाही. बारामतीची सुपारी घेणा•या परळीच्या चमच्या वाट लावल्याशिवाय राहणार नाही. काय चूक होतंय. गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर पवारांना विरोध केला. त्याच पवारांच्या पाय पडून हे खुर्चीवर बसले आहे. एमएलसीचा अर्थ आहे मुख्यमंत्र्यांचा चमचा नंतर विरोधी पक्षा नेता होऊन हा चमचा बनायचंय अशी टीका जानकरांनी केली.

तसंच संत म्हणून घेता स्वत:ला संताच्या भूमिके त राहा चमच्याच्या भूमिकेत राहु नका. संताच्या नावाखाली चोरी करणे बंद करा अशी टीका नामदेवशास्त्रींचा उल्लेख न करता जानकरांनी केली.
भाजप पक्ष काय करले हे माहित नाही. पण जानकरांचा पक्ष सदैव पंकजा मुंडेंच्या पाठीशी उभा राहिल अशी ग्वाहीही जानकरांनी यावेळी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा