आयपीएल कराबाबत कॅगचा सरकारवर ठपका

April 23, 2010 11:05 AM0 commentsViews: 1

23 एप्रिल

मुंबईत भरवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यांवर 4 कोटी 99 लाखांचे करमणूक शुल्क न आकारल्याबाबत कॅगने आक्षेप घेतला आहे.

2008 मध्ये आयपीएलने ट्वेन्टी-ट्वेन्टी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात वानखेडे इथं सहा आणि डीवायपाटील स्टेडियममध्ये चार असे दहा सामने मुंबईत खेळवले गेले. आयपीएलच्या सामन्यांच्या प्रवेश शुल्कावर करमणूक शुल्क आकारण्यात आले नव्हते.

आयपीएलचे सामने निव्वळ व्यावसायिक स्वरुपाचे होते. उद्योगपती, फिल्मस्टार्स यांचा समावेश असलेल्या 8 संघांच्या मालकांनी कोट्यवधी रुपये खर्च करुन सर्व देशातून खेळाडूंची बोली लावली होती.

त्यामुळे त्यांचा करमणूक करण्याचाच हेतू होता हे उघड आहे. त्यामुळे यावर करमणूक लावणे गरजेचे होते, असा ठपका कॅगने ठेवला आहे.

close