चंद्रपूरमधील वीजनिर्मिती थांबणार

April 23, 2010 11:11 AM0 commentsViews: 3

23 एप्रिल

चंद्रपूरमधील वीज केंद्रांना पाईपलाईनमधून होणार्‍या पाणीपुरवठयापैकी एका पाईपलाईनचा पुरवठा बंद झाला आहे.

त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होणार असून, 720 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प होणार आहे.

आधीच पाण्याच्या कमतरतेमुळे 4 संच बंद पडले आहेत. हे असेच सुरू राहिले तर, इतर तीन संचही बंद पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे चंद्रपूर केंद्राची सगळीच वीजनिर्मिती ठप्प होऊ शकते. त्यामुळे आता पाण्यासोबतच लोकांना ऐन उन्हाळ्यात जादा लोडशेडींगचा चटका सहन करावा लागणार आहे.

भुसावळमधील संच बंद

भुसावळच्या दिपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील दोन वीज निर्मिती संच बंद झाले आहेत.

या संचाच्या माध्यमातून 476 मेगावॅट वीज निर्मिती पैकी सध्या 21 मेगावॅट वीज निर्मिती होते.

हे संच बंद झाल्याने लोडशेडींगमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता हे संच सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

close