भगवानगडावर पोलीस आणि पंकजा मुंडे समर्थक आमने-सामने

October 11, 2016 5:16 PM0 commentsViews:

Bhagwan gad_police11 ऑक्टोबर : भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यानं गर्दीचा नवा उच्चांक मांडलाय. मात्र, या मेळाव्याला गालबोट लागलंय. पंकजा मुंडे समर्थक आणि पोलीस आमनेसामने आले. समर्थकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत एक पोलीस जखमी झालाय.

गडाच्या पायथ्याशी आणि गडावर प्रचंड मोठी गर्दी आज पंकजा समर्थकांनी केली. गडावर दर्शन घ्यायला सामान्यांना बंदी असतानाही पंकजा गडावर येताच तीच गर्दी गडावर दाखल झाली. त्यात अर्धा ते एक तास पंकजा मुंडेंना अडकून पडावं लागलं. ह्याच गर्दीनं पंकजा मुंडेंच्या ह्या दसरा मेळाव्याला गालबोट लावलं. काही समर्थकांनी पोलीसांवर दगडफेक केली. त्यातच एक पोलीस जखमी झालाय. जमलेला जमाव पंकजा मुंडेंना गडावरच बोलण्याचा आग्रह करत राहीला. त्यात ही गर्दी हळूहळू वाढत गेली आणि एक वेळेस तर ही गर्दी भीती निर्माण करत होती. पण नंतर गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडेंनी भाषण केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा