वैधानिक विकासमंडळांना मुदतवाढ देणार

April 23, 2010 11:28 AM0 commentsViews: 1

23 ए‌प्रिल

वैधानिक विकासमंडळांना मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती जलसंपदामंत्री अजित पवार यांनी दिली विधान परिषदेत दिली.

सर्वांशी चर्चा करून सरकार त्यासंदर्भातील निर्णय घेईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय अधिवेशन संपत आले तरी होत नाही. परिणामी त्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज काल दोन वेळा तहकूब करावे लागले.

मुदतवाढ देण्याचा विषय मंत्रिमंडळाचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. त्यावर या विकास मंडळांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे त्याबाबतचे निवेदन सरकारने विधानसभेत करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.

त्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ करून अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. अखेरीस मंत्रिमंडळात याबाबतची चर्चा पूर्ण झाल्यावर माहिती दिली जाईल, असे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले.

close