असनियेत मायनिंगला 100 टक्के विरोध

April 23, 2010 1:15 PM0 commentsViews: 5

23 एप्रिल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असनिये गावात मायनिंगबाबत झालेल्या जनसुनावणीत पर्यावरणाच्या मुद्द्यांवरुन 100 टक्के ग्रामस्थांनी मायनिंगला विरोध केला.

या मायनिंगबाबतचा पर्यावरण अहवाल पूर्णपणे खोटा आहे. तसेच तो तयार करण्यासाठी नेमण्यात आलेली भगवती ऍनालॅब्सची टीम असनिये गावात कधी आलेलीच नाही, हे ग्रामस्थांनी या जनसुनावणीत उघड केले.

पर्यावरणअहवाल तयार करणारी एजन्सी आणि त्यांच्या प्रतिनिधींची प्रशासनाला माहिती असणे गरजेचे नाही, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगताच ग्रामस्थांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला.

ही जनसुनावणी घेणारे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन हे मायनिंग लॉबीसाठीच काम करत असल्याचा आरोपही या वेळी असनियेच्या ग्रामस्थांनी केला

close